Ad will apear here
Next
भरत बलवल्ली, अक्षय खन्ना, मुनमुन सेन, चित्रांगदा सिंह
प्रसिद्ध शास्त्रीय गायक भरत बलवल्ली, अभिनेता अक्षय खन्ना, ज्येष्ठ अभिनेत्री मुनमुन सेन आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांचा २८ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
भरत बलवल्ली
२८ मार्च १९८८ रोजी भरत बलवल्ली यांचा जन्म झाला. लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं हे व्यक्तिमत्त्व! प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज; विलंबित, मध्य आणि द्रुत अशा सर्व लयींत त्यांच्या आवाजातून व्यक्त होणाऱ्या भावना ही भरत बलवल्ली यांची बलस्थानं आहेत.

भरत बलवल्ली यांचे वडील तबला वादक असल्याने त्यांच्या घरात गाण्याचं वातावरण होतच. पंडित यशवंतबुवा जोशी आणि पंडित उल्हास कशाळकर अशा दिग्गजांकडून भरत बलवल्ली यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. पंडित तुळशीदास बोरकर यांच्याकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचेही प्रशिक्षण घेतले. लहानपणी बालगंधर्वांसह अनेक थोर गायकांची गाणी ते ऐकत होते; मात्र त्यांनी दीनानाथांची गाणी ऐकली आणि आतूनच त्यांना असं जाणवलं, की हे गाणे तर मी गाऊ शकतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गाण्यांची पारायणं केली, 

भरत बलवल्ली यांच्या आवाजातील दीनानाथांची गाणी श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकारांनी ऐकली, त्यांनी दीनानाथांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेलं. हा मुलगा हुबेहूब तसंच गातोय, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. भरत बलवल्ली यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ती गणपतराव मोहिते ऊर्फ अविनाश यांच्याकडून. मोहिते हे तर दीनानाथांचे स्नेही व सहकारी. 

भरत बलवल्ली यांनी आतापर्यंत देश-विदेशात सुमारे १५०हून अधिक मैफली सादर केल्या असून, लंडनमधल्या लेसिस्टर आणि कॉलीनडेल, स्वित्झर्लंडमधल्या झ्युरिक, बाझल या परदेशातल्या मैफली आणि स्वरांकित मल्हार महोत्सव, दीनानाथ मंगेशकर स्मृती समारोह, पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव, पं. मल्लिकार्जुन मन्सूर स्मृती समारोह, पं. बसवराज राजगुरू स्मृती समारोह, सानरसखा संगीत महोत्सव या भारतातल्या मैफली त्यांनी गाजवलेल्या आहेत. 

देणे मंगेशाचे हा पं. दीनानाथ मंगेशकरांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आणि भक्तिरस हा अभंग, भजने, निर्गुणी भजने, दोहे इत्यादींचा समावेश असलेला कार्यक्रम हेही कार्यक्रम भरत सादर करतात. दीनानाथ मंगेशकर ज्यापद्धतीने शास्त्रीय संगीत गायचे, ती गायकी विलक्षण अवघड आहे. भरत बलवल्ली यांनी या गायकीवर केवळ संशोधनच केलं नाही तर त्या गायकीचं शिवधनुष्य यथार्थपणे ‘देणे मंगेशाचे’ या कार्यक्रमात पेलूनही दाखवलंय. याबद्दल मंगेशकर कुटुंबातल्या पाचही भावंडांनी त्यांचं खूप कौतुक केलंय आणि त्याचे विशेष आभारही मानले आहेत. 

भरत बलवल्ली यांना वयाच्या फक्त १९व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगद्गुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सूरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फे मिळाली आहे. या व्यतिरिक्त भरत बलवल्ली यांना आतापर्यंत पंडित विष्णू दिगंबर शास्त्री पुरस्कार, स्वर संस्कार, वाद्यसंगीतामध्ये पहिला क्रमांक आणि कै. विश्वनाथ पेंढारकर पुरस्कार, स्वरसाधना समिती लाइट क्लासिकल व्होकल्समध्ये प्रथम पारितोषिक, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन स्पर्धेत प्रथम पारितोषिक, कवी वसंत बापट गीत गौरव पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत. 
........


अक्षय खन्ना
२८ मार्च १९७५ रोजी अक्षय खन्ना यांचा जन्म झाला. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे चिरंजीव असलेले अक्षय खन्ना यांनी ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली; पण अक्षय खन्नाचा ‘हिमालय पुत्र’ हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. एका फ्लॉपनंतर अक्षय ‘बॉर्डर’ चित्रपटामध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. या चित्रपटात अक्षयसोबत सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते; पण अक्षय खन्नाचे काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरले होते. 

अक्षय खन्नाने अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. ‘बॉर्डर’, ‘दिल चाहता है’, ‘डोली सजा के रखना’, ‘ताल’, ‘गांधी माई फादर’, ‘हमराज़’, ‘दिवानगी’, ‘गली-गली चोर है’, ‘आ अब लौट चलें’, ‘मॉम’, ‘सेक्शन ३७५’ आणि ‘हलचल’ अशा चित्रपटांत त्याने भूमिका साकारल्या आहेत. 

१९९९मध्ये ‘आ अब लौट चले’ या चित्रपटातील ऐश्वर्या व अक्षयची जोडी खूपच हिट झाली होती. ‘गांधी-माय फादर’ या चित्रपटात अक्षय खन्नाने महात्मा गांधी यांचा मुलगा हरिलाल गांधी यांचे पात्र साकारले. ही भूमिका अक्षय खन्नाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील सगळ्यांत वाखाणली गेलेली भूमिका आहे.
........
मुनमुन सेन
२८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे मुनमुन सेन यांचा जन्म झाला. मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदीव्यतिरिक्त बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन म्हणजे मुनमुन यांची आई.

मुनमुन यांच्या मुली रिया सेन आणि रायमा सेन यादेखील बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मुनमुन सेन यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८४मध्ये रिलीज झालेला ‘अंदर बाहर’ हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी ‘मुसाफिर’, ‘मुहब्बत की कसम’, ‘जाल’, ‘शीशा’, ‘प्यार की जीत’, ‘माशुका’, ‘वो फिर आएगी’, ‘हंड्रेड डेज’, ‘वक्त के बादशाह’, ‘जख्मी रूह’, ‘कुछ तो है’, ‘अपना देश पराए लोग’, ‘पत्थर के इन्सान’, ‘बेलगाम’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. 

मुनमुन सेन आपल्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत. मुनमुन यांनी आता सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून, त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. 
........


चित्रांगदा सिंह
२८ मार्च १९७६ रोजी चित्रांगदा सिंहचा मेरठ येथे एका जाट कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव निरंजन सिंह असून ते भारतीय सेनेमध्ये अधिकारी होते आणि भाऊ दिग्विजय सिंह एक गोल्फर आहे. चित्रांगदाने सिनेमात पाऊल ठेवण्यापूर्वी दिल्लीमध्ये मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली होती. डान्स करणे हा तिचा लहानपणापासूनचा छंद आहे. तिने कथ्यकमध्ये शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. 

त्याशिवाय तिला खेळातही रस असून गिटार वाजविणे आवडते. चित्रांगदाची प्रतिमा कायमच एक बोल्ड आणि हॉट नायिका म्हणून राहिली आहे. चित्रांगदाची तुलना स्मिता पाटील हिच्याशी केली जाते. एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी गेली असताना तिला पहिल्या चित्रपटासाठी ऑफर मिळाली होती. हजारों ख्वाहिशें ऐसी, कल येस्टर्डे अँड टुमॉरो आणि सॉरी भाई या चित्रपटात चित्रांगदाने मुख्य भूमिका निभवल्या आहेत. चित्रांगदा सिंहने गोल्फपटू ज्योति रंधावा याच्याशी २००१ साली विवाह केला होता. २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZMFCK
Similar Posts
राजा गोसावी, भरत बलवल्ली ख्यातनाम मराठी अभिनेते राजा गोसावी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक भरत बलवल्ली यांचा २८ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language